loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड पोलीस पथकाचा लायन्स क्लबकडून गौरव

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील ३० गावांमधील मंदिरांमध्ये झालेल्या चोऱ्यांचा छडा लावण्याची कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या येथील पोलीस पथकाचा लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला. विविध मंदिरांतून धातूच्या पितळी घंटा व इतर साहित्य चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी शिताफीने गजाआड केले आहे. त्यांच्याकडून ८०० किलोचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील शिरगाव, कुळवंडी, ऐनवरे, कशेडी येथील मंदिरांमध्ये झालेल्या चोऱ्यांचा समावेश आहे. या कामगिरीबद्दल लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहोळ, विजय सातार्डेकर, कृष्णा दराडे, शिरीष साळुंके यांचा सन्मान केला. याप्रसंगी उद्योजक पारसमल जैन, लायन्स क्लब ऑफ सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, शैलेश धारिया, डॉ. विक्रांत पाटील उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg