loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थानच्या वतीने श्री महाशिवरात्रोत्सव सोहळा

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील स्वयंभू श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थानच्या वतीने श्री महाशिवरात्रोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवार दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४ वा.मान्यताप्राप्त गुरवांकडून पूजा,पहाटे ४.३० वा. चतुःर्सिमा बांधवांची शोडषोपचारे पूजा व मंत्रघोष, पहाटे ५.३० वा. ब्रह्मवृं‌दांकडून शोडषोपचारे पूजा, मंत्रघोष व रूद्राभिषेक. सकाळी ९.३० वा. पासून येणाऱ्या भजनी मंडळींची भजने,सायं. ४ वाजता ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांचे सुश्राव्य कीर्तन., रात्री १० वाजेपर्यंत येणाऱ्या भाविकांची भजने. रात्री १० वा. ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांचे सुश्राव्य कीर्तन, रात्री १२ वा.स्वयंभू श्रीदेव वेळणेश्वराची रथयात्रा सोमवार दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५ वा.मान्यताप्राप्त मानकरी गुरवांकडून पूजा,पहाटे ५.३० वा. सहस्त्र बिल्वदलपत्र पूजा, शिवपूजा व त्यानंतर येणाऱ्या भाविकांची भजने,रात्री १० वा.ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांचे सुश्राव्य कीर्तन. मंगळवार दि.१७ फेब्रुवारी २०२६ रोजी सग्रहमख रुद्र स्वाहाकार (शिवयाग सोहळा), श्री. चेदमूर्तीभूषण बर्वे गुरूजी मुंबई व सहाय्य ब्रह्मवृंद,पहाटे ५ वा.मान्यताप्राप्त मानकरी गुरांकडून पूजा, पहाटे ५.३० वा.शोडषोपचारे पूजा, आरती, मंत्रपुष्प, सकाळी ७ वा.प्रमुख संकल्प, गणपती पूजन, स्वस्तिपुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्रद्ध, आचार्यवरण, ब्रह्मादी मंडळाची स्थापना,पूजा व लघुरूद्र सकाळी १० वा.मुख्यहवन व रूद्र स्वाहाकाराला सुरुवात, महानैवेद्य, आरती व महाप्रसाद, सायं.७ वा. चतुःर्सिमा महिलांकडून श्रीदेव वेळणेश्वर मंदिरात दीप प्रज्वलन. रात्री १२ नंतर लळीताचे कीर्तन व प्रसाद.बुधवार दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ नंतर स्वयंभू श्रीदेव वेळणेश्वर सेवा महिला मंडळ (संघटीत) यांचे हळदी कुंकू तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव वेळणेश्वर व श्री देव कालभैरव देवस्थान संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg