loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीतही सत्ताधारी भाजपा पक्षाचे लक्ष: दादा मंत्र्यांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम

रत्नागिरी,दि.१४ फेब्रुवारी (संतोष कांबळे):- साहित्य संस्थांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीत साहित्य संवर्धन आघाडी विरुद्ध परिवर्तन उत्कर्ष आघाडी यांच्यात थेट लढत होत असून या निवडणुकीच्या सुरुवातीलाच कोर्ट कचेऱ्यांचा खेळ खेळण्यात आल्याने निवडणुकीत जोरदार चुरस निर्माण झाली आहे.दरम्यान या निवडणुकीतसुद्धा सत्ताधारी भाजपाच्या वजनदार मंत्र्यांनी साहित्य संवर्धन आघाडीच्या बाजूने लक्ष घातल्याची चर्चा सुरू आहे. साहित्य वर्तुळात प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूकसुद्धा सत्ताधारी पक्षाने प्रतिष्ठेची केल्यामुळे साहित्य वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साहित्य सम्राट न.चि.केळकर, लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन उत्कर्ष आघाडी व साहित्य सवर्धन आघाडीमध्ये थेट लढत होत आहे.परिवर्तन उत्कर्ष आघाडीतर्फे अध्यक्ष पदासाठी प्रा.मिलिंद गोविंदराव जोशी,प्रमुख कार्यवाह पदासाठी सुनिताराजे किसन पवार आणि कोषाध्यक्ष पदासाठी विनोद सूर्यनारायण कुलकर्णी हे विद्यमान पदाधिकारी निवडणूक लढवत आहेत. सध्या या तिन्ही व्यक्ती साहित्य परिषदेच्या पदावर कार्यरत आहेत.सातारा येथील साहित्य संमेलन यशस्वी केल्याचे त्यांच्या आघाडीतर्फे सांगण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

साहित्य संवर्धन आघाडीतर्फे अध्यक्ष पदासाठी एकांकिका चित्रपट,नाट्य लेखक व अभिनेते योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी डॉ.स्वाती महालंक,कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर हे निवडणूक लढवत आहेत.सद्या याच आघाडीला निवडून आणण्यासाठी सत्ताधारी पक्षातर्फे जोरात फिल्डिंग लावण्यात आली आहे.ही मंडळी आपल्या मातृसंस्थेची विचारधारा मानणारी असल्यामुळे त्यांना मतदान व्हावे यासाठी महाराष्ट्रातील वजनदार दादा मंत्र्यांच्या आर्शिवादाने प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.विद्यमान अध्यक्षांना १०० व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायचे असल्यामुळे त्यांना साहित्य परिषदेची सूत्रे हाती ठेवायची आहेत.असे चर्चिले जात आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षाने साहित्य परिषदेच्या निवडणुकीत भाग घेतल्यामुळे साहित्य वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg