loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरवण येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; परिसरात भीतीचे वातावरण

तिलारी (प्रतिनिधी) - तेरवण येथील शेतकरी मनोहर रामकृष्ण गवस यांच्या गोठ्यातील १० महिन्यांच्या वासरावर बिबट्याने भीषण हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री घडली. जंगलातील नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालल्याने वन्यप्राणी आता थेट मानवी वस्तीतील गोठ्यांपर्यंत पोहोचू लागले आहेत, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारीच्या रात्री बिबट्याने मनोहर गवस यांच्या गोठ्यात शिरून वासरावर हल्ला चढवला. वासराचा हंबरडा ऐकून गवस यांनी तात्काळ गोठ्याकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत बिबट्याने वासराच्या नरडीचा घोट घेऊन त्याला गंभीर जखमी केले होते. मालकाला पाहताच बिबट्याने अंधाराचा फायदा घेत जंगलात धूम ठोकली, परंतु या हल्ल्यात वासरू मृत्युमुखी पडले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शिवरात्रीच्या दिवशी तेरवण-मेढे रस्त्यावर 'ब्लॅक पॅंथर'चे दर्शन झाले होते. याशिवाय, गेल्या काही काळापासून पाळये, मेढे, मुळस आणि हेवाळे या परिसरातही बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण पट्ट्यात भीतीचे सावट आहे.

टाइम्स स्पेशल

या घटनेनंतर वनविभागामार्फत रीतसर पंचनामा करण्यात आला असला, तरी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचा बळी गेल्यावर सरकारकडून मिळणारी मदत अत्यंत तुटपुंजी आहे. "बाजारभावाच्या तुलनेत मिळणारी ही मदत अत्यंत कमी असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागते," अशी भावना हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg