loader
Breaking News
Breaking News
Foto

मच्छिमार बांधवाची माणुसकी, कासवाची सुखरूप सुटका

संगलट, खेड (इक्बाल जमादार) - दापोली- तालुक्यातील दाभोळ बंदरात एक प्रेरणादायी घटना घडली आहे. येथील मच्छिमार निलेश पडवल यांच्या होडीच्या जाळ्यात एक कासव अडकले होते. ही घटना दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते ८:०० वाजण्याच्या दरम्यान घडली. जाळ्याचे नुकसान होण्याची शक्यता असूनही, त्यांनी कोणताही विचार न करता कासवाची सुखरूप सुटका केली. समुद्री जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणाबाबतची जाणीव त्यांनी या कृतीतून दाखवून दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दाभोळ बंदर परिसरात घडलेली ही घटना सर्व मच्छिमार बांधवांसाठी तसेच समाजासाठी अत्यंत महत्त्वाची व प्रेरणादायी ठरत आहे. अशा संवेदनशील व जबाबदार कृतीमुळे निसर्गसंवर्धनाचा सकारात्मक संदेश पोहोचतो.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg