loader
Breaking News
Breaking News
Foto

करूळ घाटात एक्सयुव्ही कार दरीत कोसळली; कारचा चक्काचुर, दोघेजण बालबाल बचावले

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ घाटात खोल दरीत महेंद्र एक्सयुव्ही कार कोसळली आहे. गाडीमध्ये असलेल्या दोघांनी उडी मारल्याने ते बालबाल बचावले आहेत. या अपघातात गाडी जवळपास पाचशे फूट दरीत गेली आहे. या अपघातात गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती ओरोस कंट्रोल रूम मधून रात्री 2 वा. वैभववाडी पोलीस ठाण्यात येताच वैभववाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. करूळ घाटात पायरी घाट नजीक धोकादायक वळणावर दोन व्यक्ती बसले होते. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपली गाडी दरीत गेल्याचे सांगितले. आम्ही दोघांनीही गाडीतून उडी मारली. असे त्यांनी सांगितले. त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. पोलिसांनी त्या दोघांना उपचारासाठी गगनबावडा पोलीस ठाण्यात हलविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैभववाडी पोलिसांच्या सूचनेनुसार सह्याद्री जीव रक्षक टीम दोरीच्या साहाय्याने दरीत उतरली. त्यांनी गाडीची पाहणी केली. गाडीतील कागदापत्रे त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला होता. यावेळी पोलीस शैलेश कांबळे, सह्याद्री जिवरक्षकचे अध्यक्ष हेमंत पाटील, विजय पवार, प्रदीप मोरे, संजय पवार, तुकाराम पवार, वसंत पाटील, अमर शिंदे, आनंद शिंदे, प्रथमेश पाटील, सचिन पाटील, सिद्धेश कोलते, महेश कदम, सचिन कोलते व युवक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg