loader
Breaking News
Breaking News
Foto

भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई ७ लाख ३९ हजार किमतीचा सोन्याचा मुद्देमालासह २ आरोपी गजाआड

ठाणे (प्रतिनिधी) - विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या चोरीच्या घटनांचा शोध घेण्याच्या वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत गुन्हे शाखा युनिट -२ च्या पोलीस पथकाने केलेल्या तांत्रिक विश्लेषणाने दोन आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून ७ लाख ३९ हजार ४०० रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करून आरोपी आजाद सिंग उर्फ धनरी मधुसिंग टाक(३३) आणि अजय सिंग उर्फ मामू भूरासिंग दुधानी(२८) याना बेड्या ठोकल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने वरिष्ठांच्या आदेशाने सुरु केलेल्या गुन्ह्याच्या तपासात संभावित आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विशलेषणाद्वारे पोलीस पथकाने संशयावरून आजाद सिंग उर्फ धनरी मधुसिंग टाक(३३) व अजय सिंग उर्फ मामू भूरासिंग दुधानी, (२८) दोघे रा. दिंडोली, सुरत, राज्य गुजरात यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी दिलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात लुटलेला ७ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी न्यायालयात करण्यात आलेली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg