loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई नंतर ठाण्यात बिश्नोईं गॅंग सक्रिय, व्यावसायिकाला खणाणला बिश्नोईं गॅंगचा फोन

ठाणे (प्रतिनिधी) - मुंबईनंतर बिश्नोईं गॅंग ठाण्यात सक्रिय झाली आहे. दहा कोटीची खंडणी दे, पोलीस ठाण्यात तकार केल्यास एन्काउंटर करू अशा प्रकारची धमकी ठाण्यातील एका व्यावसायिकाला व्हाट्सअप वरून देण्यात आल्याची माहिती व्यावसायिकांनी नौपाडा पोलिसांना दिली. नौपाडा पोलीसानी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करूनघेत पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान महाशिवरातीच्या दिवशीच देण्यात आलेल्या या धमकीमुले ठाण्यात खळबळ उडालेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून ११ फेब्रुवारी, २०२६ रोजी महाशिवरात्र असल्याने तक्रारदार हे कुटुंबासह मध्यप्रदेश येथील सतनाम शिवराजपूर येथे पूजेसाठी गेलेले होते. त्याच दिवशी संध्याकाळी ४-१० ते ४-५९ वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराच्या मोबाईलवर आंतरराष्ट्रीय कॉल आला. मात्र पूजेत व्यस्त असल्याने तक्रारदार यांनी फोन उचलला नाही. त्या यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ७-५३ वाजण्याच्या सुमारास पुन्हा मोबाईलवर कॉल आला. मोबाईलवरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला “बिश्नोई ग्रुप”मधून बोलत असल्याचे सांगत, “दहा कोटी रुपये पाठवा, अन्यथा ठार मारू” अशी धमकी दिली. तसेच पोलिसांकडे तक्रार केली तरी ‘एन्काऊंटर’ करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव सांगण्यास नकार दिल्यानंतर तक्रारदारांनी कॉल कट केला.

टाइम्स स्पेशल

तसेच २० फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार हे ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील कार्यालयात असताना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून दुपारी १२.२० ते १२.२७ दरम्यान चार व्हॉट्सअ‍ॅप कॉल आले. संशय आल्याने त्यांनी कॉल स्वीकारला नाही. त्यानंतर संबंधित क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचा ऑडिओ क्लिप पाठविण्यात आला. सदर ऑडिओ क्लिपमध्येही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी तक्रारदार यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत, दिलेल्या तक्रारीनुसार त्या अनोळखी व्यक्तिविरोधात खंडणी व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रमांकांचा तपास सुरू केला असून सायबर सेलची मदत घेतली जात आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg