loader
Breaking News
Breaking News
Foto

चोरट्यांनी ऑटो ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावला

ठाणे (प्रतिनिधी) - रॅपीडो ऑटो ने ठाण्यात माजिवड्याकडे निघालेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मोबाईल नितीन कंपनीच्या उड्डाणपुलावर अज्ञात दुचाकीवरील चोरटयांनी मोबाईल खेचून पोबारा केल्याची घटना गुरुवारी ९.४९ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदार साची जाधव (वय १६) ही विद्यार्थिनी गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भांडुप येथे दातांच्या उपचारासाठी गेली होती. उपचार आटोपल्यानंतर रात्री ९.४९ वाजण्याच्या सुमारास तिने रॅपिडो ऑटो बुक करून माजीवाडा येथील घरी जाण्यासाठी प्रवास सुरू केला. दरम्यान, ऑटो रिक्षा नितीन जंक्शन उड्डाणपुलावरून जात असताना मागून मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांपैकी मागे बसलेल्या एकाने तिच्या उजव्या हातातील मोबाईल फोन अचानक खेचून घेतला आणि माजीवाडा दिशेने पळ काढला. ते अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

या घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीला रॅपिडो चालकाने उड्डाणपुलाखाली तैनात पोलिसांकडे नेले. त्यानंतर ती पोलिसांसह नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या मोबाईलची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg