loader
Breaking News
Breaking News
Foto

​माजगाव येथील २१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - पोटच्या तीन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याने नैराश्यात असलेल्या माजगाव-गरड येथील २१ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास घडली. प्रीती प्रल्हाद केतकर (माहेरची तनुजा मनोहर बागडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. नारायण बागडी यांनी या बाबत माहिती पोलिसांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२५ जानेवारी २०२६ रोजी बाळाचा निमोनियाने मृत्यू झाला. बाळाच्या निधनामुळे त्या प्रचंड मानसिक धक्क्याखाली होत्या. याच नैराश्यातून त्यांनी घरात कुणीही नसताना ओढणीने पंख्याला गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, पंकज शिंदे आणि महिला उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी घटनास्थळी भेट दिली.

टाइम्स स्पेशल

मयत प्रीती या नवविवाहिता असल्याने, तहसीलदार कार्यालयातील महिला नायब तहसीलदार श्रीमती तारी यांच्या उपस्थितीत व शासकीय पंचांच्या समक्ष मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. २१ फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात 'अकस्मात मृत्यू' म्हणून नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर अधिक तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg