सावंतवाडी (प्रतिनिधी) - शिवजयंती आणि ऑटो रिक्षा सेना चालक-मालक संघटनेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी येथे निमंत्रित भजनी मंडळांची भव्य स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तालुक्यातील सात नामवंत मंडळांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत श्री हेळेकर प्रासादिक भजन मंडळ (कारिवडे-पेडवेवाडी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक दीर्घादेवी प्रासादिक महिला भजन मंडळ यांनी, तर तृतीय क्रमांक कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ (तळवडे) यांनी प्राप्त केला. वैयक्तिक नैपुण्यामध्ये कलाकारांना गौरविण्यात आले: उत्कृष्ट गायक: भक्ती सावंत (दीर्भादेवी प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ट तबला: महंतने मन (कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ट पखवाज: सागर वारखंडकर (श्री हेळेकर प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ट झांज: शिवरुद्र सावंत (दीर्भादेवी प्रासादिक भजन मंडळ), उत्कृष्ट कोरस साथ: घोडेमुख प्रासादिक भजन मंडळ स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे ५००१ रुपयांचे बक्षीस माजी नगराध्यक्ष संजू परब, द्वितीय ३००१ रुपयांचे बक्षीस विनायक कोडल्या, तर तृतीय २००१ रुपयांचे बक्षीस राजन भांगले यांनी पुरस्कृत केले होते. बक्षीस वितरण प्रसंगी सीताराम गावडे, नगरसेविका स्नेहा नाईक, पेंडूर सरपंच संतोष गावडे, खजिनदार जयवंत टंगसाळी, राजू मेस्त्री, अध्यक्ष धर्मेंद्र सावंत, सुनील नाईक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे परीक्षण शहाजान शेख, विजय माधव व सुधीर धुमे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर पराडकर व संदेश राऊळ यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिव भाई धर्णे, न्हानू राऊळ, बाळू वालावलकर, सुनील तानावडे, सुभाष तावडे, मनोहर मसूरकर व सर्व रिक्षा चालक-मालकांनी परिश्रम घेतले. देवस्थानचे विश्वस्त निलेश वाटवे यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी संदेश राऊळ यांनी आभार मानले.





































.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)








































































































































































































.jpg)








































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.