loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री ना.प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत उद्या गोवेश्वर शिव मंदिराची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण ;रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

पणजी, 14 फेब्रुवारी (प्रतिनिधी) : गोव्याच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचा ऐतिहासिक सोहळा ओल्ड गोवा परिसरात मागील 3 दिवसां पासून सुरु असून आज ‘श्री देव गोवेश्वर’ महाशिव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा गोव्याचे कर्तबगार मुख्यमंत्री ना. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न होईल तेव्हा हा सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी हिंदुस्थानातील सर्व प्रमुख संत महंत, साधु व धर्माचार्य उपस्थित असतीलच शिवाय गोव्यातील हिंदु बंधू भगिनी देखील हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील.. या सर्वांच्या उपस्थितीत गोव्याच्या भूमीचे जणू सांस्कृतिक पुनरुत्थापन संपन्न होईल! पोर्तुगीज काळात ज्या परिसरातील मंदिरे उद्ध्वस्त झाली त्याच परिसरात हे श्री देव गोवेश्वराचे भव्य दिव्य महाशिव मंदिर रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने उभे ठाकले आहे.. या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण संपन्न होईल तेव्हा गोव्याचा धार्मिक व सांस्कृतिक स्वाभीमान पुर्नप्रस्थापित होईल! तसेच जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी “गोवेश्वर महिमा संहिता” सुमारे 1400 पृष्ठांचा ग्रंथ लिहिला असून त्याचे प्रकाशन देखील आजच दु. 3.30 वा. गोव्याच्या राज्यपालांच्या शुभहस्ते होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ‘श्री देव गोवेश्वर महाशिव मंदिरा’त सुमारे 6 फूट उंचीचे शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. तसेच पृथ्वीच्या पाठीवरील सर्वच्या सर्व 12 ज्योतिर्लिंगे देखील या मंदिरात स्थापित करण्यात आली आहेत. या सर्व 12 ज्योतिर्लिंगांसाठी 12 स्वतंत्र गर्भगृहे असून भाविकांना एकाच प्रदक्षिणेमध्ये सर्वच्या सर्व 12 ज्योतिर्लिगांचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभेल. अशा या भव्य दिव्य मंदिराचा आज प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होत आहे. गोव्यात सुमारे 450 वर्षांची पोर्तुगीज राजवट होती. या काळात गोव्याच्या धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेवर मोठे आघात झाले. अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त झाली. हिंदू धर्माची ही अस्मिता पुर्नस्थापित करण्यासाठीच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी ज्या परिसरातील मंदिरे उद्ध्वस्त झाली त्याच परिसरात भव्य दिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला. या मंदिराचे काम अनेक वर्ष सुरु होते. ते आता पूर्ण झाले असून महाशिवरात्रीच्या शुभदिनी रवि. दि. 15 फेब्रु. 2026 रोजी या भव्य अशा या श्री देव गोवेश्वर महाशिव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण संपन्न होईल.

टाइम्स स्पेशल

ओल्ड गोव्यातील हिंदू मंदिरे उद्ध्वस्त झाली त्याच परिसरात रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दक्षिण पीठाच्या वतीने जमीन घेऊन हे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले. हे मंदिर पाषाणातील कोरीव कलाकृती असून मंदिर स्थापत्य शास्त्राचा हा एक अजोड नमुना होय. या मंदिराचे संपूर्ण रेखाटन खुद्द जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी स्वत: केले हे याचे वैशिष्टय होय. हे संपूर्ण मंदिर चुनार या पाषाणाचा वापर करुन बांधण्यात आले आहे. वाराणसी म्हणजेच काशी येथील हा चुनार जातीचा दगड मंदिरासाठी अतिशय शुभ व सुयोग्य मानला जातो. हे दगड अतिशय टिकावू असतात आणि शेकडो व हजारो वर्षे हे मंदिर मजबूत राहील. या दगडावर उत्तम प्रकारचे कोरीव काम करण्यात आले आहे. प्राचीन भारतीय मंदिरात लोखंड वापरण्यात येत नसे. त्याच प्रकारे या मंदिराच्या बांधकामात कोठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही.या सोहळ्यासाठी अ. भा. षड्दर्शन आखाडा परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष श्री. महंत ज्ञानदास महाराज तसेच हिंदुस्थानातील विविध आखाड्यांचे श्री महंत व साधू संत आले आहेत. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सपत्नीक या प्राणप्रतिष्ठा विधीत सहभागी होणार आहेत.. मुख्यमंत्री ना. डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या भव्य मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होईल तेव्हा गोव्याच्या भूमीतील हिंदू धर्माची अस्मिता पुर्नस्थापित होईल!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg