loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार 9 कोटींची स्किल लॅब

​रत्नागिरी : राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भावी डॉक्टरांना प्रत्यक्ष निदानाचे उत्तम प्रशिक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विभागाच्या नियंत्रणाखालील नांदेड, अमरावती आणि रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 'टर्न-की' तत्त्वावर 'स्किल लॅब' (कौशल्य प्रयोगशाळा) उभारण्यासाठी २८ कोटी ५० लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या योजनेअंतर्गत नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच अमरावती आणि रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी ९ कोटी ५० लक्ष रुपयांची यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. सन २०२५-२६ या वित्तीय वर्षातील राज्य योजनेअंतर्गत मंजूर निधीतून हा खर्च केला जाणार असून, यामुळे या तिन्ही जिल्ह्यांतील वैद्यकीय विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्यक्ष वैद्यकीय कौशल्यांचा सराव करणे शक्य होणार आहे.

टाइम्स स्पेशल

शासनाने या खरेदी प्रक्रियेसाठी कडक अटी व शर्ती लागू केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने, खरेदी करण्यात येणारे दर हे बाजारभावापेक्षा जास्त नसावेत आणि तांत्रिक निकष (Technical Specifications) कोणत्याही एका विशिष्ट कंपनीला फायदा होईल असे नसावेत, याची खातरजमा करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण आयुक्त आणि संबंधित महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांवर सोपवण्यात आली आहे. तसेच, ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी केंद्रीय सतर्कता आयोगाच्या (CVC) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ​विशेष म्हणजे, या स्किल लॅबच्या उभारणीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात आधुनिकता येईल, परंतु यासाठी कोणतीही नवीन पदनिर्मिती करण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या तिन्ही विभागांतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg