loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत घरासमोरून दुचाकी लांबवणारा चोरटा जेरबंद; पोलिसांची तत्पर कारवाई

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी येथील माजगाव खोतवाडा परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीची 'सुझुकी ॲक्सेस' गाडी जप्त करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ​माजगाव खोतवाडा येथील रहिवासी आदित्य गोविंद खोरजूवेकर यांची सुझुकी ॲक्सेस गाडी (क्रमांक: MH 07 AW 1048) १९ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० ते २० फेब्रुवारी सकाळी ९:४५ च्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेतून अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी खोरजूवेकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मनोज राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तपासादरम्यान पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे संशयित आरोपी रवी शंकर लाखे (रा. लाखेवस्ती, सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीने ही दुचाकी सावंतवाडी शहरातच लपवून ठेवली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे. या यशस्वी कारवाईत पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे आणि सुरेश पाटील यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg