loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा बँक: रिक्त संचालक पदांवर सचिन भिंगार्डे आणि अनिल देवस्थळी यांची निवड

​रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रिक्त असलेल्या दोन संचालक पदांची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, सचिन प्रभाकर भिंगार्डे आणि अनिल राजेश देवस्थळी यांची संचालक पदी वर्णी लागली आहे. शनिवारी या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. जिल्हा बँकेच्या नागरी पतपुरवठा मतदार संघाचे संचालक संजय रेडीज यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर लांजा येथील सचिन प्रभाकर भिंगार्डे यांची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, गुहागर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संस्था मतदार संघाचे संचालक डॉ. अनिल जोशी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर जाणवली विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अनिल राजेश देवस्थळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या दोन्ही नवनियुक्त संचालकांचे बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव आणि संपूर्ण संचालक मंडळाने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. दोन्ही जागांवर नव्या दमाच्या नेतृत्वाची निवड झाल्याने बँकेच्या भावी वाटचालीस बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg