संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील संतोष प्रदीप खेडेकर यांचे कोरड्या विहिरीमध्ये पाच गवे पडल्याची घटना बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेत या पाचही रानगव्यांना बाहेर काढत त्यांना जंगलाच्या दिशेने सोडले. यासंदर्भात कृषी सहाय्यक समीर दोरखडे यांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख व सर्व स्टाफ मिळून आवश्यक साहित्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर विहीर ही कोरडी असल्याचे दिसून आली.
विहीर सुमारे १५ ते २० फूट खोल व सुमारे पंधरा फूट व्यास असल्याचे दिसून आले. या विहिरीची बॅटरीच्या उजेडात पाहणी केली असता दोन मोठे पुर्ण वाढ झालेले गवे व तीन छोटे रानगवे असे मिळून पाच रानगवे विहिरीत असलेचे दिसून आले. विहिरीची उंची जास्त असल्याने त्यांना विहिरीबाहेर पडता येत नव्हते. सदर परिस्थितीची पाहणी केली असता पडीक विहिरीला एका बाजूने जेसीबीच्या सहाय्याने वाट तयार करून विहिरीत अडकलेल्या रानगव्यांना नैसर्गिकरित्या रस्ता करून देण्यात आला.
या तयार केलेल्या मार्गावरून एकूण पाच रानगवे सुरक्षित सुमारे रात्री १:३० वा बाहेर काढण्यात आले रानगव्यास कोणतीही इजा अथवा दुखापत झालेली नसून, नैसर्गिकरित्या हे रानगवे जंगलाच्या दिशेने सुरक्षित निघून गेले. या रानगव्यांमध्ये एक मोठा नर व मादी तसेच त्यांची तीन पिल्ले असल्याचे दिसून आले. हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल संगमेश्वर देवरुख सागर गोसावी, वनरक्षक फुणगूस आकाश कडुकर, वनरक्षक आरवली सुरज तेली व वनरक्षक साखरपा सहयोग कराडे यांनी केली. सदरील रेस्क्यू ऑपरेशन करतेवेळी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते त्यांचेही सहकार्य रेस्क्यू ऑपरेशन साठी लाभले.


























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)




































































































































































































.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.