loader
Breaking News
Breaking News
Foto

वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

लांजा (संतोष कांबळे) :- तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित शैलेश रमेश डोळस विद्यानगरीतील श्रीराम विद्यालय, तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व का.रा कोळवणकर यामहा ट्रेनिंग स्कूलमध्ये जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव संतोष पडवणकर यांनी भूषविले. कार्यक्रमाला नायब तहसीलदार अनिल गोसावी, लेखक दिग्दर्शक सिने नाट्य अभिनेते असित रेडीज, राजापूर लांजा नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सावली सुनिल कुरूप, लांजा पोलीस संघटनेचे श्रीकृष्ण सरदेसाई, सहसचिव सुरेश चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष तथा सिने नाट्य अभिनेते अमोल रेडीज, संचालक रवींद्र डोळस, वेरवली बुद्रुकच्या सरपंच वेदा कोळवणकर, वेरवली खुर्दचे उपसरपंच सुरज कुरतडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पंढरी गुरव आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कृषी, कला, क्रीडा व शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये कै गंगाधर उर्फ भाईसाहेब लाड जिल्हास्तरीय जीवन गौरव पुरस्कार विजय शिवराम बेर्डे, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार दीपक नागवेकर, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पुरस्कार शशांक उपशेट्टये, आदर्श समाजभिमुख पत्रकारिता पुरस्कार प्रमोद कोनकर, कै.मनोहर कोकाटे जिल्हास्तरीय उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कार अनिकेत चव्हाण, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय कला गौरव पुरस्कार धीरज साठविलकर, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार शरद वासुदेव चव्हाण, कै.का.रा.उर्फ भाईसाहेब कोळवणकर जिल्हास्तरीय उत्कृष्ट संस्था पुरस्कार जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था लांजा, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस आदर्श तालुकास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सिताराम कदम, स्वर्गीय रमेश धोंडू डोळस तालुकास्तरीय आदर्श कर्मचारी पुरस्कार शशिकांत बाबल्या चव्हाण, कै बाळशेठ कोळवणकर आदर्श शेतकरी पुरस्कार सूर्यकांत रघुनाथ सरदेसाई यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे होते.

टाइम्स स्पेशल

श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात ढोल ताशांच्या जल्लोषात व टोयो सांस्कृतिक सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ मान्यवरांचे व सत्कारमूर्तींचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक अरुण डोळे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक अमोल रेडीज यांनी केले. कार्यक्रमात सुभाष लाड, दीपक नागवेकर, धीरज साठविलकर, संतोष पडवणकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला ग्रामस्थ, शिक्षक, पालक, आजी- माजी विद्यार्थी उपस्थित होते. सचिन कांबळे व विनोद बंडगर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मुख्याध्यापक अरुण डोळे यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg