loader
Breaking News
Breaking News
Foto

दादांचा १०० टक्के घातपात, आंतरराष्ट्रीय एजन्सीकडे चौकशी द्याः आमदार रोहित पवार

पुणे - २८ जानेवारीला अजित पवार यांना घेवून जाणारे विमान कोसळले. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या अनेक समर्थकांनी हा घातपात असल्याचे म्हटले. मात्र आता दिवंगत अजित पवार यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनीही हा १०० टक्के घातपास असल्याचे म्हटले आहे. तसे या अपघाताची आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अनेक मुद्दे मांडले आहेत, त्यामध्ये ३ वर्ष विमान चालवण्यास बंदी असलेल्या सुमित कपूर यांना विमान चालवण्यास का दिले? यापूर्वी त्यांनी दारु प्यायलेली होती. तसेच विमान उतरण्यासाठी योग्य वातावरण नसताना विमान उतरवले, उड्डाण केल्यानंतर विमान खाली उतरण्याची गती प्रचंड होती. २ दिवस आधी विमान सुरत ला का गेले? विमानाचा आवाज वेगळा का येत होता? कपूरने अवघड रनवेची निवड का केली? मृत्यू समोर असतानाही कपूर गप्प का? फॉरेन्सिकची टीम उशिरा का आली? याची चौकशी भारतीय यंत्रणांसह फ्रांसमधील बीइए आणि अमेरिकेतील एएआयबी आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून व्हायला हवी असेही ते म्हणाले. दरम्यान आज आमदार रोहित पवार दिल्लीला पोहोचले असून तेथे याच विषयावर ते पत्रकार परिषद घेणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg