loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री भैरी भवानी क्रिडा मंडळ, गिम्हवणे आयोजित क्रिकेट स्पर्धेत ऋतुराज फायटर्स ची बाजी

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरालगतच्या गिम्हवणे ग्रामदैवत श्री. भैरी देवस्थानच्या भव्य पटांगणात श्री भैरी भवानी क्रिडा मंडळ, गिम्हवणे यांच्या वतीने गिम्हवणे प्रीमियर लीग 2026 पर्व 4 अंडरआर्म नाईट बॉक्स भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा 18 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 या दरम्यानच्या कालावधीत अतिशय खिलाडीवृत्तीने उत्साहात पार पडल्या. या आयोजित स्पर्धेत एकूण 10 संघानी आपला सहभाग घेतला होता. अशा या स्पर्धेतील अंतिम लढतीचा सामना ऋतुराज फायटर्स विरुद्ध श्री दत्तकृपा गिम्हवणे यांच्यात झाला. अंतिम सामन्यात ऋतुराज फायटर्स या संघाने आपल्या प्रतिस्पर्धी श्री.दत्त कृपा गिम्हवणे संघावर मात करत रोशन मंडपे संघ मालक असलेल्या ऋतुराज फायटर्स संघाने ८ विकेटने अंतिम सामना जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऋतुराज फायटर्सला प्रथम क्रमांकाचा आकर्षक चषक आणि रोख रक्कम रुपये 21 हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश देऊन कमिटी अध्यक्ष कैवल्य झगडे आणि सुरज करडे तसेच झगडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अनंत किरडवकर संघ मालक असलेल्या श्री दत्त कृपा गिम्हवणे संघाला व्दितीय क्रमांक तर विणा आणि वीर ओमकार साळवी यांच्या जे.के. स्पोर्ट्स संघाला तृतीय क्रमांक तसेच निशांत शिर्के यांच्या नित्या इंटरप्राईजेस क्रिकेट संघाला चतृर्थ क्रमांकाने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाज जे.के. स्पोर्टच्या सुरज जाधव यांना तर दत्त कृपा गिम्हवणे च्या संदेश साळवी या खेळाडूला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले त्याचप्रमाणे स्पर्धेतील मालिकावीराचा किताब ऋतुराज फायटर्सच्या साई उदय झगडे या खेळाडूला जाहीर करण्यात आला त्याला सायकल देऊन त्याचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तर अंतिम सामन्यात सामनावीराचा मान ऋतुराज फायटर्स च्या प्रशांत ढगे यांना देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

गेले तीन दिवस चाललेली ही क्रिकेट स्पर्धा भैरी भवानी क्रिडा मंडळ, गिम्हवणे, गिम्हवणे प्रिमियर लीग २०२६ च्या आयोजक कमिटीचे अध्यक्ष, कैवल्य झगडे, उपाध्यक्ष, सुशांत मंडपे, सचिव अमित किरडवकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ओमकार साळवी, सागर गोसावी, सुरज करडे, अंकित करडे, अंकित लवरे, मेघनाथ लाड, ऋतिक येलवे आणि तमाम गिम्हवणे वासीयांनी घेतलेल्या मेहनतीमुळे स्पर्धा यशस्वी झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg