loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा व्यापार्‍याची आत्महत्या, आजरपण की सावकारी कर्ज? तपास सुरु

रत्नागिरी : तालुक्यातील तोणदे येथील आंबा व्यावसायिक रुपेश उर्फ बाब्या नागवेकर यांच्या आत्महत्येचा तपास ग्रामीण पोलिसांकडून सुरु असून, मागील महिना-दोन महिन्यात त्यांना आलेल्या कॉलचा डाटा तपासून पोलिसांकडून फोन करणाऱ्यांचे जवाब नोंदवले जात आहेत. त्यामुळे नेमका कोणत्या कारणातून नागवेकर यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली हे चौकशीत पुढे येणार आहे. काही दिवसांपूर्वी तोणदे येथील आंबा व्यावसायिक बाब्या नागवेकर यांनी स्वत:वर शेती संरक्षण बंदुकीमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. आजारपण व कर्ज व्यवहारामुळे ही आत्महत्या केल्याची चर्चा सुरु होती. पोलिसांनी सर्वप्रकारचे पर्याय डोळ्यासमोर ठेवत तपास सुरु ठेवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मागील दीड-दोन महिन्यात आलेल्या कॉलची माहिती, सीडीआर रिपोर्ट पोलीस घेत आहेत. अनेकवेळा फोन करणाऱ्या लोकांना बोलावून त्यांचे जवाबही पोलीस घेत आहेत. सावकारीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली का याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. घरातील व्यक्तींचेही लवकरच जवाब नोंदवले जाणार आहेत. त्यातून तपासाच्या दृष्टीने आणखी काही माहिती हाती येण्याची शक्यता आहे. याप्रकरणात कोणी जबाबदार असेल तर त्याच्या कारवाई केली जाईल असा विश्वास ग्रामीण पोलीस निरीक्षक यादव यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg