loader
Breaking News
Breaking News
Foto

खोडदे येथील अनुज साळवी याची सिंगापूर अभ्यास दौऱ्यासाठी निवड

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील खोडदे गावातील होतकरू विद्यार्थी अनुज संदेश साळवी याची सिंगापूर येथे होणाऱ्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, राजापूर, रत्नागिरी येथील आणि सद्यस्थितीत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड येथे शिक्षण घेत असलेल्या अनुजची स्वान (SWAN) फाउंडेशन, पुणे यांच्या मार्फत राज्यस्तरीय परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवत निवड झाली आहे. या निवडीमुळे अनुजला दि. 26 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत सिंगापूर येथील विविध शैक्षणिक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अभ्यास दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना सिंगापूरमधील आधुनिक तंत्रज्ञान, शैक्षणिक संस्था, विज्ञान संग्रहालये तसेच जागतिक दर्जाच्या विकासकामांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. अनुजसाठी हा दुसरा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौरा असून त्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा अनुभव अत्यंत मोलाचा ठरणार आहे. अनुजच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावातील नागरिक, शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामुळे खोडदे गावाचे तसेच नवोदय विद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे. अनुजच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यात तो आणखी मोठे यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg