उरण (घन:श्याम कडू)- महाराष्ट्रभर गाजत असलेल्या भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात तुरुंगात असताना त्याची ‘वरात’ उरणमध्ये धडकली, अशी संतप्त चर्चा सध्या उरण तालुक्यात रंगत आहे. चाणजे (ता. उरण) येथे समोर आलेल्या जमीन व्यवहाराने केवळ महसूलच नव्हे, तर निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कारण, ज्या दिवशी अशोक खरात अटकेत गेला, त्याच दिवशी त्याची फरार पत्नी कल्पना अशोक खरात हिच्या नावावर जमिनीच्या नोंदीची प्रक्रिया सुरू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी कल्पना खरात यांच्या नावावर चाणजे (ता. उरण) येथे जमीन घेण्यात आली.ही जमीन नोंदणीकृत खरेदीखताद्वारे कल्पना खरात यांच्या नावावर घेण्यात आली. हा व्यवहार सुमारे ५८ लाख ५० हजार रुपयांचा असल्याचे समजते. व्यवहारानंतर अवघ्या काही दिवसांतच, १७ मार्च २०२६ रोजी तलाठी सजा चाणजे यांनी वर्दी नोटीस चावडीवर प्रसिद्ध केली, आणि नेमक्या याच दिवशी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्याची नोंद आहे. अटक आणि नोंद प्रक्रिया एकाच दिवशी हा निव्वळ योगायोग आहे का, की आधीच आखलेली ‘योजना’? असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. यानंतरही व्यवहाराचा वेग थांबला नाही. १३ एप्रिल २०२६ रोजी फेरफार क्रमांक ८३५१ मंजूर करण्यात आला. म्हणजे, संपूर्ण व्यवहाराची महसूल नोंद प्रक्रिया अवघ्या एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात आली. विशेष म्हणजे, या काळात संबंधित महिला फरार असल्याची चर्चा सुरू असतानाही कागदोपत्री प्रक्रिया वेगाने पार पडल्याने संशय अधिकच बळावला आहे.
सामान्य नागरिकांना सातबार्यावर नाव चढवण्यासाठी महिने-वर्षे लागतात आणि इथे फरार व्यक्तीच्या नावावर जमीन ‘एक्सप्रेस’ वेगाने? हा कसला प्रशासनिक न्याय? या संपूर्ण प्रकरणात दुय्यम निबंधक उरण, तहसीलदार उरण, मंडळ अधिकारी चाणजे आणि तलाठी चाणजे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, नायब तहसीलदार पेडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेरफार नोंद कार्यालयात प्राप्त झाली होती. मात्र पुढील कार्यवाहीसाठी कोणीही पुढे न आल्याने आणि सातबारा उतार्यावर नोंद न झाल्याने ती रद्द करण्यात आली आहे. तथापि, व्यवहार झालेला असल्याने पुढे कोणी आले तर नोंद पुन्हा करता येऊ शकते. म्हणजे व्यवहार ‘रद्द’ असला तरी ‘जिवंत’ आहे? आणि कधीही पुन्हा सक्रिय होऊ शकतो? यामुळेच नागरिकांमध्ये अधिक संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे.

































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.