देवळे (प्रकाश चाळके) - सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी, माननीय राजेश चौगुले फाउंडेशन अंकलखोप ता.पलूस आयोजित राज्यस्तरीय 'नारी शक्ती पुरस्कार' सोहळ्यात देवरुख येथील भारती जयंत राजवाडे यांना २०२६ च्या नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे फाउंडेशन विनाशुल्क सेवा देणारे असून, त्यांच्या निस्वार्थ सेवा कार्याचा भाग म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा दिमाखदार सोहळा शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी बसवेश्वर चौक येथील ग्रामपंचायत पटांगणात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. राज्यभरातून आलेल्या विविध प्रस्तावांची आणि त्यांच्या कामाची सखोल छाननी केल्यानंतर भारती राजवाडे यांच्या सेवाभावी वृत्तीची आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार फाउंडेशनचे प्रमुख पाहुणे शुभदा जोशी, ममताताई सिंधुताई सपकाळ नारीशक्ती मान्यवरांच्या हस्ते भारती राजवाडे यांना मानाची शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ममताताई सिंधुताई सपकाळ (प्रकल्प संचालक, बालसंगोपन शिक्षण संस्था), भारती सुनील कोळी (गटशिक्षण अधिकारी, जल जीवन मिशन विभाग), रत्नप्रभा दबडे (विस्तार अधिकारी, कोल्हापूर), समीक्षा लक्ष्मण पाटील (सरपंच), अश्विनी अमोल साळुंखे (सरपंच) आणि श्रीमती राजेश्वरी शशिकांत सावंत आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या सौ.शितल राजेश चौगुले होत्या. या सोहळ्याचे नेटके नियोजन फाउंडेशनचे सर्व आयोजक यांनी केले होते. यावेळी परिसरातील सरपंच ग्रामस्थ आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.























































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.