loader
Breaking News
Breaking News
Foto

दांडी धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या सोलर हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान २०२५-२६ अंतर्गत दांडी धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या सोलर हायमास्ट दिव्याचा उद्घाटन सोहळा मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा स्थानिक नगरसेविका अन्वेषा अजित आचरेकर आणि भाजपचे तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशमय सुविधेमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण शहरातील दांडी धुरीवाडा परिसरातील नागरिकांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी लक्षात घेऊन या हायमास्ट दिव्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. दांडी येथील श्रीकृष्ण मंदिर हा परिसरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा भाग आहे. या ठिकाणी सोलर हायमास्ट बसविल्यामुळे आता रात्रीच्या वेळी परिसर उजळून निघणार असून यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठी मदत होणार आहे. या महत्त्वपूर्ण सुविधेबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत. या उद्घाटन प्रसंगी सुधाकर मालंडकर, सचिन तारी, संजू धुरी, नरेश धुरी, रुपेश धुरी, भरत सारंग, प्रसाद धुरी, राजू धुरी, संजय धुरी, नागेश कुबल, विनायक धुरी, निहार धुरी, हेमंत पराडकर, सुनील धुरी, कृष्णा कुबल यांच्यासह दांडी धुरीवाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg