loader
Breaking News
Breaking News
Foto

बळीराज सेनेचा ३ रा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

पनवेल - रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी दादर येथील देवराज हॉल येथे अक्षय तृतीयेच्या पवित्र दिनी बळीराज सेनेचा ३ रा वर्धापन दिन सोहळा उत्साहात मोठया उत्साहात पार पडला. बळीराज सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक बालम यांचे औक्षण करण्यात आले, त्यानंतर दिपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजनांचा दानशूर राजा बळीराजा यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बळीराज सेना पक्षाचे दिवंगत नेते नंदकुमार मोहिते आणि कृष्णा कोबनाक यांना पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. डिजिटल मिडीया प्रमुख दिनेश हरड व त्यांच्या टिमने तयार केलेलं पक्ष संघटन आणि कार्यकर्ता सक्षमीकरण यांचे प्रेडोटेंशन अड. विनेश वालम यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. प्रेझेटेंशनमध्ये बळीराज सेना पक्षाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आणि पुढील राजकीय यशस्वी वाटचालीसाठी तयार केलेला रोडमॅप दाखविण्यात आला. भविष्यकाळात आपल्या पक्षाने कोणती कार्ये केली पाहिजेत यांचे नियोजन सर्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. त्यानंतर बळीराज सेनेचे कार्यकर्ते असलेले विविध विभागातील पदाधिकारी शहापूरचे दशरथ भोईर, अंधेरीचे संतोष चव्हाण, नाणार रिफायनरी विरोधक मानसी धनावडे यांनी आपले अनुभव सर्वांसमोर कथन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अध्यक्षीय भाषणांत बोलतांना अशोक वालम यांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम छोटे - मोठे व्यवसाय सुरु करुन आपल्या पोटाचा प्रश्न सोडवावा आणि नंतरच राजकारणात यावे, बळीराज सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांना विविध व्यवसाय सुरु करुन देण्यासाठी लवकरच दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात येणार असून त्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर, भाषण कौशल्य, कार्यकर्ता जोडणे, व्यवसाय प्रशिक्षण शिबीर, ज्यांना खरोखरच व्यवसाय करावयाचा आहे त्यांनीच या शिबिरात भाग घ्यावा असे आवाहन केले. राजकारणात असतांना सरकारविरोधात आवाज उठवितांना फक्त पत्र व्यवहार न करता आंदोलनेव्दारे तसेच मोर्चा काढून कसे त्यांना वेठीस आणू शकतो यांची उदाहरणे देत ८३ नंबरमध्ये कुणबी जात समाविष्ट करण्यासाठी कसे आंदोलन केले, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देवून मुंबईतील चाकरमानीला 'कोकणवासी' संबोधण्यासाठी सरकारी परिपत्रक काढले, गेली १८ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम त्वरीत चालू करुन २२ कोटीचा निधी उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते उपलब्ध करुन दिला. आशा वर्कस, अंगणवाडी सेविका यांना न्याय मिळवून दिला. स्कूल व्हॅनचा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न शासनदरबारी चर्चा करुन मार्गी लावला, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी आपण सातत्याने लढा देत आहोत, हीच आपल्या कार्याची खरी ओळख आहे. पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देवून अध्यक्षांनी सर्व कार्यकर्ते यांना २०२९ च्या निवडणूकीसाठी आतापासून तयारीला लागा असे आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

शरद मोरे व डिजिटल मिडीया प्रमुख दिनेश हरड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच बळीराज सेना पक्षातर्फे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचाही विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम सर्वोतोपरी यशस्वी करण्यासाठी युवा नेतृत्व अॅड. विनेश वालम यांच्या कुशल नेतृत्वाखाली मनोहर पवार, मनोहर डोंगरे, विजय मांडवकर, अनिल मॉडे, संतोष टक्के आणि सहकारी यांनी बहुमोल सहकार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg