loader
Breaking News
Breaking News
Foto

‘जुनी पेन्शन’ सह विविध मागण्यांसाठी बेमुदत संप; सिव्हिल रुग्णालयीन कामकाजावर परिणाम

ठाणे (प्रतिनिधी) - राज्य सरकारी कर्मचारी संघटना, गट ‘ड’ चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ, तांत्रिक कर्मचारी तसेच नर्सेस फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. या संपाचा थेट परिणाम सिव्हिल रुग्णालयातील कामकाजावर झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. जुनी पेन्शन योजना लागू करावी, सरळसेवा भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, १९८१ चा शासन निर्णय पुनर्जीवित करावा, कॅशलेस विमा योजना लागू करून संबंधितांना कार्ड देण्यात यावे, तसेच परिचारिकांना बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावे अशा विविध महत्त्वाच्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे (सिव्हिल रुग्णालय) अध्यक्ष अनिल घेगडमल, नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा स्नेहा ठाकूर तसेच तांत्रिक विभागाचे मनोहर गरजे, शर्मिला पठारे आदींच्या नेतृत्वाखाली परिचारिका, तांत्रिक कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपामुळे सिव्हिल रुग्णालयातील नियमित सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रुग्णांना आवश्यक सेवा मिळण्यात विलंब होत असून, प्रशासनासमोर पर्यायी व्यवस्था उभारण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कर्मचारी संघटनांनी आपल्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg