वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना अंतर्गत कणकवली विधानसभा क्षेत्रस्तर समितीवर प्रगतशील शेतकरी महेश संसारे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे स्थानिक शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. नुकतीच कणकवली विधानसभा अंतर्गत समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री यांची निवड जाहीर झाली आहे. वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र महेश संसारे यांची या समितीवर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. संसारे हे प्रगतशील शेती पद्धतींचा अवलंब करणारे शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत उल्लेखनीय प्रगती साधली असून, इतर शेतकऱ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
या समितीच्या माध्यमातून शेत पानंद रस्त्यांच्या विकासाला चालना देणे, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सोयीस्कर रस्ते उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे हे उद्दिष्ट आहे. संसारे यांच्या निवडीमुळे या कामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ संपूर्ण कणकवली विधानसभा क्षेत्राला होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. संसारे म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यात योग्य समन्वय आल्यास प्रत्येक व्यक्तीची प्रगती निश्चित शक्य आहे. प्रत्येक क्षेत्रात अडचणी आहेत. शेतीत देखील अनेक समस्या, अडचणी आहेत. शेतीतून आर्थिक प्रगती साधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सहकार्यांची भूमिका देखील घेतली पाहिजे.

































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)

































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.