loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये २५ रोजी सकल हिंदू समाजाचे संमेलन

खेड - खेडमध्ये येत्या शनिवारी दिनांक २५ एप्रिल रोजी सकल हिंदू समाज आयोजित विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. खेड शहर, भरणे, वेरळ, भोस्ते, खोंडे व भडगाव या गावांतील सकल हिंदू समाजाचे बांधव व भगिनी या हिंदू संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. दिनांक २५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता ग्रामदेवता श्री खेडजाई मंदिराजवळ मालशे फार्म येथे हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनात पारंपरिक वारकरी दिंडी, गायन, पोवाडा, सामूहिक धार्मिक मंत्रोच्चार व पठण आणि प्रवचन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड तालुक्यामध्ये दिनांक 25 एप्रिल रोजी खेडमध्ये व दिनांक 01 मे रोजी मुरडे येथे हिंदू संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनांच्या यशस्वीतेसाठी खेड तालुक्यातील सकल हिंदू समाज व हिंदू बांधव-भगिनी मेहनत घेत आहेत. या संमेलनांच्या सर्व कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव- भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज हिंदू संमेलन नियोजन समितीकडून करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg