loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड शहरातील विविध समस्या घेऊन खेड शहर आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांची भेट

खेड (प्रतिनिधी) - खेड शहरातील विविध समस्या घेऊन खेड शहर आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी ची भेट घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे गौसभाई खतीब यांनी शहरातील रस्त्यांची जी दयनीय अवस्था झालेली आहे त्याला नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी जबाबदार असल्याचे सांगितले. खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे झालेले अपघात आणि धुळीच्या साम्राज्यांमुळे झालेले श्वसनाचे त्रास अशा सर्व लोकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल सदरे यांनी सुर्वे इंजिनिअरिंग ते तीनबत्ती नाका येथील काम अतिशय संथ गतीने चालू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती भयानक झालेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर रस्ता ८ दिवसात नागरिकांसाठी चालू झाला पाहिजे, असा इशारा प्रशासनाला दिलेला आहे. मुख्य रस्त्या बाजूला साईड पट्टी व गटारे दोन महिन्यात पूर्ण झाले नाही तर पावसाळ्यात व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी जावून व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. पर्यायी रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्यांमुळे नागरिकांना त्रास होतोय त्यावर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले रस्ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले पाहिजेत, अशी मागणी अनिल सदरे यांनी केली.

टाईम्स स्पेशल

काँग्रेसचे माजी नगरसेवक बशीर भाई मुजावर, शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रणव म्हापुस्कर, वंचित बहुजन आघाडीचे किरण तायडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संदीप धारिया, महमद काझी यांनी शहरातील विविध समस्यांचा पाढाच मुख्याधिकारी यांच्याकडे मांडला. यावेळी आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg