खेड (प्रतिनिधी) - खेड येथील स्वराज गुजराती यांच्या विरुद्ध खेड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 353 व 269 नुसार गुन्हा दाखल केला होता. फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी तपास काम करून निष्कर्ष काढला की फिर्यादी पोलीस संपत मच्छिंद्र गीते हे भरणा नका पोलीस चौकीजवळ कर्तव्यावर असताना आरोपी स्वरूप गुजराती हा दुचाकी घेऊन तेथे आला व पोलिसांनी थांबवायला सांगून सुद्धा न थांबता पुढे गेला तसेच नंतर त्याने पोलिसांकडे धक्काबुक्की केली व अंगावर हात उचलला म्हणून त्यास अटक करून जिल्हा न्यायालयात त्याच्याविरुद्ध चौकशी करण्यात आले. आरोपीच्या वतीने एडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे संपत मच्छिंद्र गीते, पोलीस फिर्यादी तसेच कुंदन सातपुते, अंकुश शिंदे, निलेश खेराडे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अक्षय संतोष जाधव, प्रशांत लक्ष्मण भोसले, पोलीस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वीरेंद्र आंबेळे, सुजित गडदे वगैरे यांनी साक्ष दिली या सर्वांचे उलट तपास एडवोकेट सुधीर शरद बुटाला यांनी घेतला.
फिर्यादीने व सदर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अक्षय संतोष जाधव यांनी सांगितले की आरोपी हा बेफान झाला होता. तो पोलिसांना उद्धट बोलत होता व अंगावर धावून येत होता. त्याने धक्काबुक्की केली असे सविस्तर वर्णन त्यांनी केले. तर नंतर या सर्वांच्या उलट तपासात एडवोकेट बुटाला यांनी सदर घटना अशक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच सीसीटीव्ही फुटेज का हजर केले नाही या मुद्द्यावर भर दिला. तसेच अनेक महत्त्वाचे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हजर केले. सदर एडवोकेट सुधीर शरद बुटाला यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय सह जिल्हा न्यायाधीश यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
























































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.