loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल तर्फे खेडवासीयांसाठी व लहान मुलांकरिता विशेष जागरूकता शिबीर

खेड - इन्फिगो आयकेअर खेड व नगरपरिषद खेड आणि सहजीवन प्रायमरी स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने खेड नगरपरिषद येथे लहान मुलांकरिता डोळ्यांचे प्रॉब्लेम्स, डोळ्यांची काळजी, तिरळेपणा यांसाठी विशेष मार्गदर्शन देण्यात आले. अखिल भारतीय बालनेत्र रोग तज्ञ विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप देशपांडे यांनी अतिशय सुंदर व सोप्या पद्धतीने विद्यार्थी व शिक्षक मान्यवर यांना माहिती दिली. या कार्यक्रमासाठी खेड मधील प्रथम नागरिक नगराध्यक्ष माधवीताई बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश चिकणे, बांधकाम सभापती सुनिल दरेकर, नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर तसेच डॉ. साधना धारिया व सहजीवन शाळेचे प्राचार्य प्रदीप चव्हाण हे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी खेड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष डोळ्यांचे महत्व व काळजी बाळगण्याकरिता उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल इन्फिगो आयकेअर चे कौतुक केले. लहान मुलांच्या आरोग्याविषयी पालकांमध्ये जागरूकता असणे आवश्यक आहे असे त्यांच्या मार्फत सूचित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg