loader
Breaking News
Breaking News
Foto

​इन्सुली माडभाकरवाडीत विद्युत लाईन तुटून गवताच्या गंजी खाक; ५० हजारांचे नुकसान

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - इन्सुली माडभाकरवाडी येथे 'इलेव्हन केव्ही'ची मुख्य विद्युत वाहिनी तुटल्यामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमध्ये शेतकरी गोविंद कृष्णा आमडोसकर यांच्या गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत शेतकऱ्याचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे संबंधित शेतकऱ्याला तात्काळ २५ हजार रुपयांची रोख नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली. इन्सुली माडभाकरवाडी परिसरात विजेची तार अचानक तुटली. यामुळे उडालेल्या ठिणग्यांनी शेतकऱ्याच्या गवताच्या गंजीने पेट घेतला. यात सर्व गवत जळून भस्मसात झाले. घटनेनंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, मात्र सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्याला तुटपुंजी मदत देऊ करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी पाहून राऊळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "जोपर्यंत संबंधित शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत एकाही कर्मचाऱ्याने खांबावर चढू नये किंवा वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू नये," असा सज्जड दम त्यांनी दिला. ​त्यांनी तात्काळ महावितरणचे कार्यकारी अभियंता वनमोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. "वारंवार तक्रार करूनही यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे ही वेळ आली आहे, त्यामुळे तात्काळ भरपाई द्या," असा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने नमती भूमिका घेतली. राऊळ यांच्या मध्यस्थीनंतर संबंधित शेतकऱ्याला जागीच २५ हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. भरपाई मिळाल्यानंतर सायंकाळी ७:३० च्या सुमारास संपूर्ण पंचक्रोशीतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, "परिसरातील जीर्ण झालेले खांब आणि विद्युत तारा त्वरित दुरुस्त करा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल," असा इशारा राऊळ यांनी दिला आहे. याबाबत उद्याच कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

​यावेळी महावितरणचे कनिष्ठ अभियंता ठाकूर, इन्सुली क्षेत्रफळ पोलीस पाटील प्रिया कोठावळे, हेमंत नाईक, आप्पा आमडोसकर, कृष्णा कोठावळे, महेश धुरी, संदीप कोठावळे, बांदा ग्रामपंचायत सदस्य राजाराम सावंत, जावेद खतीब, ज्ञानेश्वर सावंत, रामचंद्र कोठावळे, प्रशांत वारंग, सुजय कोठावळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg