loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतमधील तीन कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत गटविकास अधिकारी यांना पत्र

खेड - खेड तालुक्यामधील शिरगाव ग्रामपंचायत मध्ये गेल्या पाच वर्षात सुमारे तीन कोटी पाचशे रुपये किमतीचा भ्रष्टाचार ग्रामसेवक, सरपंच आणि ठेकेदार यांच्या संगनमताने झाल्याचे उघडकीस आले आहे. समाजसेवक काशीराम भोसले (काका) यांनी याबाबत संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (B.d.o) गणेश मंडलिक यांना लेखी निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. काका भोसले हे गेली 22 वर्ष मुंबई शहरांमध्ये पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत होते, पदभाराचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी गावच्या विकासाला प्राधान्य देण्याचे ठरवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परंतु गावामध्ये चाललेला कारभार पाहता त्यांना त्यांच्या ग्रामपंचायतीत सावळा गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले, त्याची रक्कम बघून डोळे पांढरे होतील, बागवाडी जिल्हा परिषद शाळा ही 30 मे 2021 ला पूर्ण बंद झालेली आहे, तरी 11 ऑक्टोबर 2019 ला रुपये 24000/- किमतीचा स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी केल्याचे दाखवण्यात आले, अशा प्रकारची 30 बिले अमोल बापू पवार या नावाने अदा करण्यात आलेली आहेत.

टाईम्स स्पेशल

पिंपळवाडी येथे धोबीघाट रुपये (2,36,250/-) दोन लाख छत्तीस हजार दोनशे पन्नास ठेकेदार अमोल मच्छिंद्र जाधव यांच्या नावे तो रुपये पन्नास हजार किमतीचा नसल्याचे दिसते हर घर जल ही तीन कोटींची योजना राबविण्यात आली परंतु ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते शिरगाव गावामध्ये शिरगाव युवा प्रतिष्ठानʼ ची सत्ता ग्रामपंचायत मध्ये असून प्रभारी ग्रामसेवक अजित बापू पवार हे गेली बारा वर्षे या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत आहेत. यांचा कार्यकाळ हा संशयित असून झालेल्या प्रकाराबद्दल प्रशासन काय भूमिका घेणार याकडे काका भोसले व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg