loader
Breaking News
Breaking News
Foto

दुर्गा ऑर्गेनिक्स कंपनीत युवकाची आत्महत्या

खेड : तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील दुर्गा ऑर्गेनिक्स कंपनी परिसरात १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीनकुमार प्रमोद सिंग (रा. कमोरिया हाथी बाजार, तेदुई, वाराणसी, उत्तर प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना १६ मे रोजी रात्री १० ते १७ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले. मयत नितीनकुमार प्रमोद सिंग हा काही वेळापासून दिसून येत नसल्याने त्याचा नातेवाईक सुख्खु लालताप्रसाद सिंग यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी परशुराम येथील दुर्गा ऑर्गेनिक्स कंपनीच्या बॉयलर शेडमध्ये छतावरील लोखंडी पाईपाला गमछाच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत नितीनकुमार आढळून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पंचासमक्ष मृतदेह खाली उतरवून कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून नितीनकुमार प्रमोद सिंग यास मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली असून आत्महत्येमागील कारणांचा तपास पोलीस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg