दापोली (वार्ताहर) : महाराष्ट्र शासन, एमसीसीआय (MCCI), मायक्रोसॉफ्ट आणि आयमॅट (IMAT) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेचपुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या “कृषी हॅकेथॉन २०२६” या देशातील सर्वात मोठ्या कृषी नवोपक्रम स्पर्धेत डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने उल्लेखनीय यश संपादन केले. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञान आणि कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील संशोधक व नवउद्योजकांनी तब्बल १२९० प्रकल्प सादर केले होते. माजी व विद्यमान कुलगुरू, उद्योजक तसेच शास्त्रज्ञांच्या निवड समितीने कृषी संबंधित नऊ उपविभागांमधून १२० प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड केली होती. पुणे येथे तीन दिवस विविध स्तरांवर या प्रकल्पांचे परीक्षण करण्यात आले.
कल्पकता, तांत्रिक डिझाइन, आर्थिक मांडणी, औद्योगिक व विस्ताराच्या संधी तसेच उपयुक्तता या निकषांवर ज्युरी आणि सुपर ज्युरींकडून चार टप्प्यांत कठोर परीक्षण करण्यात आले. त्यातून अंतिमतः १८ उत्कृष्ट प्रकल्पांची निवड करण्यात आली. या हॅकेथॉनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले, तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाकडून सादर करण्यात आलेल्या पाच प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांनी तिसऱ्या स्तरापर्यंत मजल मारली. अंतिम फेरीत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे हेमंत श्रीरामे आणि नितीन पालटे यांच्या प्रकल्पांची निवड झाली. या दोन्ही प्रकल्पांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे पारितोषिक व मानपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या यशामागे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भावे, अधिष्ठाता डॉ. नारखेडे यांचे प्रेरणादायी सहकार्य तसेच डॉ. अतुल मोहोड यांचे तांत्रिक मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे सांगण्यात आले. या उल्लेखनीय यशामुळे विद्यापीठाचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून कृषी क्षेत्रात संशोधन व नवोपक्रमाला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.



































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.