गुणदे (वार्ताहर) - खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील खोकेधारकांना काही दिवसापूर्वी एमआयडीसी विभागाकडून खोके हटवण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. सदरच्या नोटीसनुसार खोके हटवले नाही तर शासनाकडून ते पाडण्यात येतील असे नमूद करण्यात आले होते. एमआयडीसीच्या नोटिसीच्या भीतीने खोके धारकांनी आपल्या खोक्यातील सामान व खोके शेड हलवण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसापूर्वी उद्योग भवन येथे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत खोके धारकांची बैठक पार पडली होती.
परंतु आता खोके हटवले जाणार हे निश्चित असल्याचे समजल्याने खोके धारक स्वतःहून आपल्या खोक्यातील सामान व खोक्याची शेड हलवण्यास सुरुवात करत आहेत. कित्येक वर्ष या खोक्यावरती अनेकांचे रोजगार सुरु होते. यासह भाजीपाला दुकाने, स्टेशनरी दुकाने, वैद्यकीय सेवा व मेडिकल दुकान वडापाववाले, चिकन-मटनवाले यांसह अनेक खोकेधारक होते. त्यामुळे अनेकांची गैरसोयी दूर होत होती. एमआयडीसीमध्ये येणार्या अनेक वाहनचालक व रोजगाराकरता येणार्या कामगारांचीही आता गैरसोय होणार आहे.



































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.