loader
Breaking News
Breaking News
Foto

पैसा फंड संस्थेच्या जडणघडणीत व्यापारी मंडळींचा त्याग मोठा : वैभव खेडेकर

खेड - संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्था आणि शाळेला भेट देण्याची आपली खूप इच्छा होती. ही संस्था चळवळीतील आहे. गेली ९७ वर्ष अनेक अडचणींवर मात करत संस्था टिकवायचं काम सोपं नाही. पारतंत्र्याच्या वेळेस संगमेश्वर येथील व्यापारी मंडळींनी गोरगरीब आणि होतकरू मुलांना शिक्षणाची दारं खुली करून देण्याचा केलेला विचार थोर होता. आज त्या विचारांचा वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज मुलांनी केलेल्या स्वागताने मी भारावून गेलो. पैसा फंडची शैक्षणिक वाटचाल अभिमानास्पद आहे. या संस्थेला पूर्ण सहकार्य करुन शाळेला भव्य मैदान तयार करुन देण्याचं अभिवचन खेडचे माजी नगराध्यक्ष व राज वैभव पतसंस्था खेडचे अध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिले. पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वैभव खेडेकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, स्नेह ज्योती विद्यालयचे उत्तम कुमार जैन, सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक अनिरुद्ध निकम, संतोष नलावडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, करण खेडेकर, राजवैभव पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदू साळवी, प्रदीप भोसले, दिनेश अंब्रे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते वैभव खेडेकर यांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचा संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते शाल- श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका जिल्हा स्तरावर यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. वैभव खेडेकर यांनी श्रीफळ वाढवून वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रारंभी लेझीम नृत्याच्या ठेक्यावर सर्व मान्यवरांचे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी बहारदार स्वागत केले. यावेळी बोलताना सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचे संचालक अनिरुद्ध निकम म्हणाले की, संस्था चालवणे सध्या मोठे जिकरीचे बनले आहे. अशा स्थितीत व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर, शिक्षणातील विविध टप्प्यात करत असलेली प्रगती नक्कीच अभिनंदनीय आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असताना कमी होणारी पटसंख्या पाहता यामध्ये टिकून राहणं अवघड बनलं आहे, मात्र पैसा फंड संस्थेने आपल्या दर्जाच्या जोरावर पटसंख्याही टिकवून ठेवली आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन अनिरुद्ध निकम यांनी यावेळी दिले.

टाइम्स स्पेशल

प्रशालेत सुरू असणारी कलेची चळवळ नक्कीच अभिमानास्पद आहे. प्रशालेतील कलादालन हे शाळा स्तरावरील एक भूषण म्हणून नावारूपाला आले आहे. यासाठी येथील सर्व कलाकार विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे निकम यांनी नमूद केलं. यावेळी बोलताना स्नेह ज्योती विद्यालयाचे उत्तम कुमार जैन म्हणाले की, पैसा फंड हे शिक्षण क्षेत्रातील मोठं नांव आहे. व्यक्तीगत ओळख निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अशा स्नेहसंमेलनची गरज असते. पैसा फंडच्या लेझीम नृत्यातून मला येथे गावचा सुगंध अनुभवायला मिळाला. गेल्या ९७ वर्षात या शैक्षणिक वास्तूने असंख्य मुलांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवले, आज अशा भव्य समारंभामुळे ही वास्तू आनंदाने भरुन पावली असेल. चांगले संस्कार करण्याचं काम गुरुजन करतात. या संसाराच्या शिदोरीतून विद्यार्थ्यांनी आपल्या भावी आयुष्याला उत्तम आकार द्यावा असे आवाहन जैन यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी तर, आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी केले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बहारदार नृत्य कार्यक्रम सादर करून उपस्थित पालक वर्ग आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. उपस्थितांनी विद्यार्थ्यांवर बक्षीसांचा वर्षावही केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

संस्थेला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg