loader
Breaking News
Breaking News
Foto

​मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची सावंतवाडी नगरपालिकेला भेट

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच सावंतवाडी नगरपालिकेत 'फिल्ड व्हिजीट' (क्षेत्र भेट) आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. ​या भेटीदरम्यान नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी नगरपालिकेचे दैनंदिन कामकाज आणि प्रशासकीय व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. विशेषतः नागरिकांकडून जमा होणारा कर आणि त्याचा शहराच्या विधायक कामांसाठी होणारा विनियोग.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​पाणीपुरवठा व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन प्रक्रिया. शहरात राबवले जाणारे आगामी प्रकल्प, वाहतूक व्यवस्था आणि नियमांचे पालन करण्याचे महत्त्व विशद केले. ​यावेळी नगराध्यक्षांनी 'स्वच्छ व सुंदर सावंतवाडी' ठेवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहनही केले. ​प्रशासकीय कामात रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रती विद्यार्थ्यांनी आदराची भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

शाळेच्या या उपक्रमाचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले आणि संचालक मंडळाने कौतुक केले आहे. ​याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg