loader
Breaking News
Breaking News
Foto

​दुग्ध व्यवसायातूनच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती शक्य; इन्सुलीत गुणवंत विद्यार्थी व दूध उत्पादकांचा गौरव

सावंतवाडी (प्रतिनिधी) - शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे गांभीर्याने पाहिल्यास निश्चितपणे आर्थिक उन्नती होऊन दरडोई उत्पन्न वाढू शकेल. सध्या दुधाला मोठी मागणी असून उत्पादन कमी आहे, त्यामुळे तरुण आणि महिला वर्गाने या व्यवसायाकडे वळणे काळाची गरज आहे, असे आवाहन इन्सुली सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांनी केले. इन्सुली सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना भेटवस्तूंचे वाटप आणि गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वाधिक दूध संकलन करणाऱ्या प्रथम पाच शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शेतकऱ्यांनी यश मिळवले: आनंद भगवान शेट्ये (प्रथम), संजय श्रीधर सावंत (द्वितीय), रुपेश लहू परब (तृतीय), फॅली पार फर्नांडिस (चौथा), विलास कृष्णा गावडे (पाचवा) आदींचा समावेश आहे. ​यावेळी दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये ​रेश्मा संदेश पालव (प्रथम), गितेश गोकुळदास पोपकर (द्वितीय), व ​भ्रुंजल दिनेश गावडे (तृतीय) यांचा समावेश आहे. समाजशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवल्याबद्दल सृष्टी संतोष सावंत हिचा विशेष सन्मान करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

​या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष सहदेव सावंत, सचिव संजय सावंत, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, माजी चेअरमन जगन्नाथ झाट्ये, सखाराम बागवे, रामचंद्र पालव, विलास गावडे, सुधीर गावडे, गुरुनाथ हळदणकर, सूर्यकांत सावंत, अशोक पडवळ, सूर्यकांत दळवी यांसह बहुसंख्येने दुग्ध उत्पादक उपस्थित होते. ​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर यांनी केले, तर आभार संजय सावंत यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान सर्व दूध उत्पादक सभासदांना संस्थेच्या वतीने उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg