loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी अकबर दसुरकर

संगमेश्वर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेल संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी अकबर दसुरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी अल्पसंख्यांक सेल रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जाकीर शेकासन, संगमेश्वर तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, चिपळूण तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष समीर काझी, संजय गांधी निराधार योजना चिपळूण तालुका अध्यक्ष शौकत माखजनकर, राजेंद्र सुर्वे, मजीद नेवरेकर, आसिफ धामणस्कर, जमीर मुल्ला आदि मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मुराद आंबेडकर यांच्या निधनानंतर संगमेश्वर तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपद रिक्त होते. ज्येष्ठ कार्यकर्ते अकबर काका दसुरकर यांची आमदार शेखर निकम यांच्या शिफारशीने अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी त्यांची संगमेश्वर तालुका अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांना नियुक्तीपत्र आमदार शेखर निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पक्षाने आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, असे अकबर दसुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त कारताना सांगितले. यावेळी पै. मुराद आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टाइम्स स्पेशल

यावेळी संगमेश्वर तालुका महिला अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष सबिहा नेवरेकर, मुखतार तांबू, जिक्रिया वणू, अहमद अली अब्बास, समीर वणू, लियाकत नेवरेकर, इकबाल काझी, अस्लम डावे, फिरोज नेवरेकर, इस्लाम दसुरकर, जळालं वणू, निसार बांगी, आलीयस धामस्कार, इकबाल शेखदारे, ताहीर दसुरकर, रियाज काझी, मुराद दसुरकर, मझर काझी, मुईफ दसुरकर, राजू तांबे, शकील नेवरेकर, अयान पावसकर, इरम दसुरकर, राबिया नेवरेकर, खतीजा नेवरेकर आदि उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg