loader
Breaking News
Breaking News
Foto

साळेल गावात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामे मंजूर

मालवण (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून साळेल गावात मंजूर झालेल्या विकासकामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यात जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत साळेल नांगरभाटवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, साळेल मोगरणे रस्त्याला कुळकरवाडी महापुरुष मंदिरनजीक संरक्षक भिंत बांधणे या मंजूर कामांचा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या माध्यमातून खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत आहेत. मागील अनेक वर्षे रखडलेली काही विकासकामे तसेच जनतेच्या मागणीनुसार वाडी वस्तीवर असलेली विकासकामे आगामी काळात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्राधान्याने मंजूर केली जातील. असे दत्ता सामंत यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, माजी जि.प. सभापती संतोष साटविलकर, साळेल सरपंच रवींद्र साळकर, उपसरपंच नाना परब, ग्रामपंचायत सदस्य विकी पेडणेकर, सिद्धी पवार, संपदा गावडे, समीर गावडे, ग्रामसेविका स्वरा परब, ग्रामस्थ गणपत पडवळ, भानजी गावडे, जयप्रकाश गावडे, माजी सरपंच कमलाकर गावडे, एकता पोफळे, श्रेया पडवळ, शिवराम गावडे, तात्या गावडे, कृष्णा गावडे, परेश गावडे, गणेश गावडे, स्वरा पडवळ, रवींद्र परब, रमेश मासये, गणेश गावडे, नरेश गावडे, शाखप्रमुख साबाजी गावडे आदी व इतर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg