loader
Breaking News
Breaking News
Foto

अपघात रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम होणे आवश्यक

संगलट खेड (इक्बाल जमादार) - देशभरात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे वेगाने विस्तारत असताना अपघातांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढत आहे. वेग, वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष, ओव्हरलोड वाहने, तसेच मद्यधुंद वाहनचालकांमुळे महामार्गावर दररोज अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम व प्रभावी होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. सध्या अनेक महामार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असले, तरी त्यांची संख्या अपुरी असून अनेक ठिकाणी कॅमेरे बंद अवस्थेत किंवा निकृष्ट दर्जाचे आढळतात. काही ठिकाणी कॅमेऱ्यांची देखभाल न झाल्याने अपघात घडूनही स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध होत नाही. परिणामी अपघातातील दोषी शोधणे, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणेकठीण जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही दिवसांपूर्वीच नडगाव येथे रात्री उशिरा बाईकवरून जाणाऱ्या दोघांचा झालेल्या अपघातातील मृत्यू हा या निमित्ताने चर्चेचा विषय झाला असून यासंदर्भात पोलीस यंत्रणांना आवश्यक असलेली सीसीटीव्ही यंत्रणेतील मदत प्राप्त झालेली नाही याकडे नागरिकांचे लक्ष राहिले आहे. यामुळेच अशा पद्धतीच्या अपघातानंतर तपास कामी या यंत्रणा अधिक सक्षम होणे आवश्यक असल्याचेच दिसून येते. सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम झाल्यास अपघातांचे नेमके कारण समजू शकते, त्वरित मदतकार्य सुरू करता येते आणि गुन्हेगारी घटनांवरही आळा बसू शकतो. तसेच वाहतूक पोलिसांना थेट नियंत्रण ठेवता येऊन वाहतुकीची शिस्त सुधरण्यास मदत होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हाय रिझोल्युशन कॅमेरे, नाईट व्हिजन सुविधा, वेग मोजणारी प्रणाली आणि थेट नियंत्रण कक्षाशी जोडणी करणे गरजेचे आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत असलेल्या तीर्थक्षेत्र पर्यटन मार्गावरही मागील काही वर्षात झालेल्या अपघातांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी देखील सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे.

टाइम्स स्पेशल

राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मिती बरोबरच या मार्गावर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असले तरीही त्यांची संख्या अत्यल्प आहे. हे झालेल्या घटनांतून समजून आले आहे, कायदा सुव्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या प्रत्येक गावाच्या वेशीवर अशा पद्धतीचे सीसीटीव्ही यंत्रणेची मार्ग क्रमिका सुरू ठेवल्यास प्रत्येक गावातील या मार्गांवर पोलीस यंत्रणेला अपघातानंतर आवश्यक असणारी माहिती उपलब्ध होणे सहज शक्य आहे. यासोबतच सीसीटीव्ही यंत्रणेची नियमित देखभाल, मनुष्यबळाची नियुक्ती आणि दोषी वाहनचालकांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली गेली, तर महामार्गावरील अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल. सुरक्षित प्रवासासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांकडूनही मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg