loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत गॅस आणि पाणी पाईपलाईनच्या कामाचा रहिवाशांना मनस्ताप; प्रशासनाविरोधात जनक्षोभाचा इशारा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर कॉलनी परिसरात सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन आणि पाणीपुरवठा लाईनच्या कामामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे संतापलेल्या नागरिकांनी आता थेट प्रशासनाला इशारा दिला असून, प्रा. सिद्धेश नेरुरकर यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या महिनाभरापासून सर्वोदय नगरमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, या कामामुळे नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी आजारांचा सामना करावा लागत आहे. कामासाठी वापरण्यात येणार्‍या यंत्रसामग्रीमुळे परिसरात प्रचंड धूळ आणि घाण पसरली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचा त्रास, आमांश (डिसेन्ट्री) आणि उलट्या यांसारख्या व्याधींनी ग्रासले आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नगरपरिषदेचा किंवा टाऊन प्लॅनिंग विभागाचा एकही जबाबदार कर्मचारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतो, अशी गंभीर तक्रार रहिवाशांनी केली आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप होत आहे.

टाइम्स स्पेशल

जर येत्या दोन दिवसांत हे काम थांबवून, योग्य खबरदारी घेऊन आणि प्रशासनाच्या उपस्थितीत पुन्हा सुरू करण्यात आले नाही, तर सर्वोदय नगरमधील नागरिक स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असा इशारा प्रा. सिद्धेश नेरुरकर यांनी दिला आहे. केवळ ’आज होईल, उद्या होईल’ अशा खोट्या आश्वासनांमुळे परिस्थिती अधिक हाताबाहेर गेल्याचे त्यांनी नमूद केले. सुधारणा करायच्या असतील तर त्या लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचवून नकोत. या नियोजनशून्य कारभारामुळे उद्भवणार्‍या जनक्षोभाला प्रशासनच जबाबदार राहील. असे प्रा. सिद्धेश नेरुरकर यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg