loader
Breaking News
Breaking News
Foto

दांडेली येथे गोशाळेचे दोन बालकांच्या हस्ते केले भूमिपूजन, नाईक यांचा पुढाकार

मळेवाड - दांडेली येथे आल्हाद नाईक यांच्या पुढाकाराने गोशाळा उभारण्यात येत असून याचा भूमिपूजन सोहळा अन्वय नाईक व मानस मराठे या दोन बालकांच्या हस्ते करण्यात आला. गो हत्या रोखण्यासाठी व गाईंचे संगोपन होण्याच्या दृष्टीने ॲड.तथा सामाजिक कार्यकर्ते आल्हाद नाईक यांनी गोशाळा उभारण्याचा संकल्प सोडला होता. आनंद नाईक यांच्या संकल्पनेतून व नाईक यांच्या पुढाकाराने उभारण्यात येणाऱ्या गोशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन सोहळा अन्वय आल्हाद नाईक व मानस हेमंत मराठे या दोन बालकांच्या हस्ते करण्यात आला. तर पूजन आनंद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी आल्हाद नाईक यांनी आपले मत व्यक्त करताना ज्या गाईंचे संगोपन मालक करू शकत नाही किंवा ज्या गाई बेवारसपणे रस्त्यावर फिरतात अशा गाईंना गोशाळेमध्ये आणून त्यांचे संवर्धन व पालन पोषण करण्यात येणार असून सदरची गोशाळा साई आधार ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही नाईक यांनी सांगितले. तसेच यासाठी दात्यानी व गो प्रेमींनी या कार्यासाठी हातभार लावावा असे आवाहन नाईक यांनी केले आहे. यावेळी आल्हाद नाईक, मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे, ऐश्वर्या नाईक, अनुश्री नाईक, अन्वय नाईक, मानस मराठे, प्रमोद मुळीक, राघोबा देसाई, संदीप वेटे, बंटी कवठाणकर, आनंद नाईक, आनंद आपटे, आनंद मुळीक आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg