loader
Breaking News
Breaking News
Foto

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त “ज्ञानियांचा राजा–मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने “ज्ञानियांचा राजा–मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि.२५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता बॅरिस्टर नाथ पै बहुउद्देशीय सभागृह, सावंतवाडी येथे होणार आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) या ग्रंथाद्वारे अध्यात्म, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या विचारांमुळे महाराष्ट्रातील संतपरंपरा, वारकरी संप्रदाय तसेच सामाजिक ऐक्यभाव अधिक दृढ झाला. त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत व्याख्याते गणेश शिंदे या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत.

टाईम्स स्पेशल

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने होत आहे. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे आदी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, वारकरी बांधव, संत साहित्य अभ्यासक तसेच रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg