loader
Breaking News
Breaking News
Foto

आ. भास्करराव जाधव यांची किमया, एका बंधाऱ्याने पालटले चित्र आणि दृष्य

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - तालुक्यातील कापसाळ या गावच्या नदीवर मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेला सिमेंटचा पक्का बंधारा गावासाठी वरदान ठरला आहे. या एका बंधाऱ्याने गावातील चित्र आणि दृष्य दोन्ही बदलून गेले आहे. दरवर्षी उन्हाळयात कोरडेठाक पडणारे नदीचे पात्र तुडुंब भरून गेले आहे. परिणामी नदी किनारी असलेल्या विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबली आहे. ही किमया घडवून आणणाऱ्या आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते या बंधाऱ्याचे उद्घाटन पार पडले. कापसाळ हे चिपळूण शहराला लागून असलेले गुहागर विधानसभा क्षेत्रातील गाव. शहरालगत असले तरी उन्हाळयाच्या दिवसांत गावाला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. गावात पाण्याचा उद्भव नसल्यामुळे पाण्याची वर्षानुवर्षाची समस्या. कामथे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले नदीचे पात्र धरणातील पाणी आटले की उन्हाळयाच्या दिवसांत कोरडेठाक पडायचे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मतदारसंघाचे आमदार म्हणून भास्करराव जाधव यांनी सातत्याने प्रयत्न केले. कळवंडेच्या धरणाखाली विहीर बांधली तरच गाव पाण्याने समृध्द होईल, याची खात्री असल्याने त्यांनी या योजनेसाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देतो. त्यासाठी फक्त ग्रामपंचायतीचा ठराव आणि लागणारी कागदपत्रांची मागणी त्यांनी केली. पण, ग्रामपंचायतीने काही ठराव दिला नाही. त्यामुळे योजना बारगळली. त्यानंतर कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हीटीने योजना राबवावी म्हणून आमदार जाधव यांनी विधानसभेत संघर्ष केला आणि ३३ गावच्या योजनांसाठी तब्बल १०० कोटींची योजना मंजूर करून घेतली. त्यातही कापसाळ गावाचा समावेश त्यांनी करून घेतला. परंतु, गावाला पाण्याची गरज नाही. आम्हाला योजना नको, असं लेखी पत्र ग्रामपंचायतीने देवून योजना नाकारली. एकीकडे मंजूर करून आणलेल्या योजना नाकारण्याचे काम ठराविक लोकांकडून सुरू होते तर दुसरीकडे गावातील ग्रामस्थ व महिला सतत येवून पाणीप्रश्न सोडविण्याची मागणी आमदार जाधव यांच्याकडे करत होते. त्यांनी यातून मार्ग काढताना नदीवर पक्का बंधारा बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.

टाईम्स स्पेशल

बंधारा पूर्ण झाल्यानंतर नदीचे दृष्यच पूर्णपणे बदलून गेले आहे. कोरडेठाक पडणाऱ्या नदीपात्राला तलावाचे स्वरूप आले आहे. अषा या बंधाऱ्याच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थ बदललेल्या परिस्थितीबाबत भरभरून बोलत होते. आमदार जाधव यांनीही पाणीप्रष्नाकडे गांभीर्याने लक्ष देवून काम केल्यामुळे यावर्षी संपूर्ण मतदारसंघात एकही टॅंकर लागलेला नाही. संपूर्ण मतदारसंघ टॅंकरमुक्त झाल्याचे सांगितले. त्याचवेळी १९९५ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर चिपळूण तालुक्यात गावागावात केलेल्या योजना अजूनही सुरू असल्याची उदाहरणे अनेक गावांची नावे घेवून दिली. कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख सुभाष जाधव, पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव, विभागप्रमुख राम डिगे, सुकाई देवस्थानचे विश्वस्त अशोक साळवी, कापसाळ दुकानखोरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन संजय चांदे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg