loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात शहीद दिन संपन्न

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महावि‌द्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाळण्यात आला. यावेळी. प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई, डॉ. प्रवीण सनये व संगणक प्रशिक्षक कदम या मान्यवरांच्या हस्ते कॉ. शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन करून त्यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी कॉ. शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव या क्रांतिकारकांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षेपात आढावा घेतला. तसेच शहीद दिनाचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमाला प्रा. सौम्या चौघुले, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, वरिष्ठ लिपिक स्नेहल संसारे, ग्रंथपाल धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण व महावि‌द्यालयातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार प्रा. सौम्या चौघुले यांनी मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg