loader
Breaking News
Breaking News
Foto

रायगड जिल्ह्यात देवा ग्रुप फॉउंडेशन च्या भव्य मोफत आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खेड (प्रतिनिधी) - रायगड जिल्ह्यातील देवा ग्रुप फाउंडेशनच्या आरोग्य विभागामार्फत, रायगड जिल्हा सह कार्याध्यक्ष धीरज प्रदीप माळवी यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सर्वसामान्य आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. शिबिरात ७० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १० रुग्णांना पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला देवा ग्रुप फाउंडेशनचे अनेक मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते: कोकण विभाग अध्यक्ष डॉ. अनिकेत प्रदीप मेस्त्री कोकण विभाग उपाध्यक्ष विनोद भगत कोकण विभाग सचिव अ‍ॅड. विश्वनाथ भगत सल्लागार डॉ. सुरेंद्र हरिश्चंद्र धुमाळ रायगड जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाईक जिल्हा संघटक यश घरत या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक धीरज माळवी होते. यावेळी मित्र परिवारातून अमित वायदंडे, रूपेश जाधव, कौस्तुभ म्हात्रे, आदित्य पाटील, प्रतीक माळवी, अंकित पाटील, ओमकार पेढवी, यश घरत, अजिंक्य पाटील यांचे विशेष योगदान लाभले. तसेच अष्टविनायक हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र धोकवडे आणि लायन्स हेल्थ फाउंडेशन, चोंडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते: सामाजिक कार्यकर्ते अभिलाष दादा माळवी शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस शंकर (आप्पा) म्हात्रे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर ग्रामपंचायत सदस्या संजना पाटील माजी सरपंच सचिन म्हात्रे विद्यार्थी आघाडी अध्यक्ष लक्ष्मण पाटील (पेण) कार्यक्रमाचे आयोजक धीरज प्रदीप माळवी आणि कोकण विभाग अध्यक्ष डॉ. अनिकेत प्रदीप मेस्त्री यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी देवा ग्रुप फाउंडेशन व मित्र परिवाराने विशेष मेहनत घेतली, असे त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg