आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील आबलोली येथील श्री नवलाई देवी मंदिर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य (विभाग रत्नागिरी, केंद्र गुहागर) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेश भगवान सांबरे यांच्या 50 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथे महिलांसाठी खास "खेळ पैठणीचा" हा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम आबलोली गावाच्या वतीने आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या 50 व्या जन्मदिनाच्या निमित्ताने पैठणी खेळाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. "खेळ पैठणीचा"या खेळामध्ये आबलोली गावातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. यामध्ये अटीतटीच्या सामन्यात श्रावणी अनिकेत पागडे हि पैठणीची प्रथम मानकरी ठरली तर वृषाली राकेश पालशेतकर हि पैठणीची द्वितीय मानकरी ठरली. या दोघींनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पैठणी प्रदान करण्यात आल्या.
"खेळ पैठणीचा"या खेळामध्ये महिलांसाठी खास अनेक खेळ खेळवण्यात आले. यामध्ये महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. अतिशय शिस्तबद्ध आणि जल्लोषात "खेळ पैठणीचा" कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अतिशय चांगले नियोजन आणि अँकरिंग रत्नागिरी जिजाऊ संस्थेचे पाली विभाग सदस्य साहिल गोरे यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य सचिव केदार चव्हाण यांनी ही या कार्यक्रमाला भेट देऊन महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर जिजाऊ संस्थेचे गुहागर तालुका समन्वयक आणि ॲड.प्रसाद जांगळे, आबलोली गावचे खोत सचिन कारेकर, प्रमोद गोणबरे, ॲड. प्रमेय आर्यमाने यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी सहभागी महिलांनाही मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गावचे प्रमुख यशवंत पागडे, गावकर अनंत पागडे, दिनेश शिंदे, अनंत जानू पागडे, कृष्णा उकार्डे, कृष्णा पालशेतकर, पोलीस पाटील महेश भाटकर, निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके, सदस्या पायल गोणबरे, शैला पालशेतकर, नम्रता निमुणकर, माजी सभापती पूर्वी निमुणकर, सी.आर.पी. मिनल कदम, वेदिका पालशेतकर, अंगणवाडी सेविका श्रद्धा भाटकर आदी. बहुसंख्य महिलांनी सहभाग नोंदवला होता. शेवटी ॲड. प्रमेय आर्यमाने यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबलोलीच्या ग्रामस्थांचे तसेच जिजाऊ संस्थेचे गुहागर तालुका समन्वयक ओमकार तीवरेकर आणि ॲड. प्रसाद जांगळे तसेच उत्कृष्ट अँकर साहिल गोरे यांचे मौलिक सहकार्य लाभले.







































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.