नवी मुंबई ( जितेंद्र गावडे ) :- कामावरून घरी जात असताना एका वृद्ध महिलेला वाटेमध्ये भेटून शेठला मुलगा झाला आहे पुढे साडी वाटप चालू आहे असे सांगून गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेऊन चोरी करून नेल्याप्रकरणी त्रिकुटाला रबाळे पोलीसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली असून पोलिसांच्या या कार्यकर्तुत्वाचे कौतुक होत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुसया दत्ता शिंदे (वय ५९ वर्ष, रा. रबळेगाव नवी मुंबई) या दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी निघाल्या होत्या. याचवेळी त्यांना तीन तरुणांनी वाटेमध्ये भेटून शेठला मुलगा झाला आहे, पुढे साडी वाटप चालू आहे, असे सांगून अनुसया शिंदे यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सुमारे १ लाख ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून घेऊन चोरी करून नेले होते. याबाबाबत शिंदे यांनी रबाळे पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञाताविरोधात 926/2025 BNS कलम 318 (4)3 (5) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
सदरचा गुन्हा घडल्या नंतर रबाळे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पो.नि बाळकृष्ण सावंत, पो.नि (प्रशासन) बनसोडे, पो नि (गुन्हे) संजय गवळी यांच्या सुचने प्रमाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि दिपक खरात व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी गुन्हयाच्या अनुशंगाने घटनास्थळाचे निरीक्षण करून घटनास्थळावर असणारे CCTV कॅमेरे पाहून तसेच तांत्रिक विश्लेषणावरून व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अशोक विठ्ठल काळे (वय २२), विष्णू शिवाजी पवार (वय २७), लखन उर्फ कार्तिक दारासिंग काळे (वय १९ वर्ष) सर्व राहणार कोपर खैरणे नवी मुंबई यांना पकडण्यात यश मिळवले. त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता खालील गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाही करीता अटक करण्यात आले आहे. सदर संशयीत आरोपीनी गुजरात, ठाणे, मुंबई शहर येथे बतावणी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या तपासकामी सहा. पोलीस निरीक्षक दिपक खरात, पो हवा. दर्शन कटके, मयूर सोनवणे, पोना गणेश वीर, धनाजी भांगरे, पोशि यादवराव घुले, मनोज देडे आदी पोलीस कर्मचाऱ्यानी सहभाग घेतला.







































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.